पुन्हा एकदा रात्र
पुन्हा एकदा रात्र
फक्त दीड वाजतोय
वाचायचा कंटाळा आलाय
अर्थहीन शब्द
वाक्ये बेजान
तरीही पानोपान व्यवस्थित
एकाखाली एक पडलेली
पूर्णविरामांशी अपरिहार्य टकरा देत
तेच विचार तेच प्रश्न
काही वास्तव
काही खाजवून काढलेले
तीच उत्तरे -
काही प्रामाणिक, काही पळपुटी
बहुतेक सगळीच अर्धवट
सगळं जणू गोठावलं गेलंय डोक्यात
विचार जेव्हा घेराओ घालतात
थकलेल्या मेंदूला
तेव्हा आम्हीसुद्धा सपशेल कबूल करतो
‘घेराओ हिंसक असतात’
असले काही तरी विचार
एकसारखे
अन
झोपेनं अलिकडे
असहकार पुकारलेला...
Comments
Post a Comment