बुद्धा
गंमत अशी आहे बुद्धा,
माणूस जेव्हा राजवाड्यातून बाहेर पडतो
दु:खाच्या शोधात
तेव्हा तो होतो बुद्ध. भगवान बुद्ध.
आणि
एखाद्या खोपटात पैदा होणारा
जेव्हा झगडतो दु:खाशी
वेशीबाहेर टांगून घेऊन
किंवा
पाईपात मोर्चे बांधून
तेव्हा मात्र तो होतो
‘महारडा’ - नवबौद्ध!
(दै. श्रमिक विचार, १ नोव्हें. १९८३)
Comments
Post a Comment