घोडा लंबे रेसका है! अश्वमेधाच्या घोडयाला तो अडवणार आहे !! बोले सो निहाल , सत श्री अकाल , माझ्या भावांनो वाहे गुरू , माझ्या बहिणींनो सलाम , शेतक-यांनो . सलाम , तमाम भूमिहिनांनो राम राम , ऊस तोडणी कामगारांनो शेतीतून बाहेर पडणा-या तरूणांनो , शेतीत राबराबूनही मान-सन्मानाचे पिक हाती न येणा-या मैत्रिणींनो , स्वत:च्या देशातच निर्वासित झालेल्या टाळेबंद नागरिकांनो शहरात मोलमजूरी करणा-या कोरडवाहूंनो , ज्ञानबा-तुकाराम . पुंडलिक वरदा हारी विठठल कौतुक माऊली , हमी भावाच्या पांडुरंगाची ओढ लागलेल्या तुम्हा वारक-यांचं कौतुक , तुमच्या सहनशक्त्तीचं थंडीवा-यात , उन-पावसात , हाल अपेष्टांकडे दुर्लक्ष करत एका असमान लढयात उतरलेल्या वेडयापिरांचं अखंड भारताच्या उन्मादी जयजयकारात खंदक खोदुन अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून पाणी-तोफा डागून तुमचं स्वागत झालं पण तुम्ही शांत राहिलात कारण या देशाच्या सातबा-यावर मूळ नोंद तुमची आहे दिल्लीच्या वेशीवर आज इतिहास कुस बदलतो आहे कारण धर्म , जात , प्रांत ...
Comments
Post a Comment