मानुषी
तू म्हणजे अनाकलनीय कोडं
कधी गंभीर तू , उदास अबोल तू
कधी खट्याळ तू , अल्लड मधुबाला तू
मोहमयी उन्मादक तू , गरम नरम आमंत्रण तू
कधी राग राग तू , कधी वात्सल्याचा महापूर तू
हळवी रडवी व्याकूळ कधी तू
लबाड फसवी धूर्त कधी तू
कधी चेतवणारी शामा चंचल
भल्या पहाटे शांत निग्रही
विरागिनीही ध्यानस्थ कधी तू
आधार शोधताना दिशाहीन कधी तू
अबोल विरहिणी शापित यक्षिणी कधी तू
आश्वासित, घनगंभीर, स्वतंत्र, निर्भय
आकाश पेलताना
तेजस्विनीही आधार कधी तू
Comments
Post a Comment