प्रिय दादा , लेक टायपिंगची बातमी ऎकली बाबा पेपरात फोटू बघितलं टिवी वर तर बघतच राह्यलो खुळ्यावानी लै कौतिक वाटलं , दादा भारी काम केलासा उर अक्षी भरुन आला आईचं सोड , बापु आपला - एवढा कठिन मानूस त्याचंबी डोळं पाणवलं बघ दादा , सावित्री आलीया माहेराला तुझ्यावर लै जीव होता तिचा पन तू म्हनला शहरातली पायजे , शिकलेली पायजे नाराज झाली बिचारी मला तर लै आवडली होती ती भेटली आज मला म्हनली - कवा येनार दादासाहेब तुमचे ? शिकायला गेला शहराला अन परका झाला हुरडा खायला येतुया फकस्त अन सारखं फोटु काढतया त्याला म्हनव एवढं लेक टायपिंग करतुयास जरा आमची चारीबी दे की दुरूस्त करून कुटपन फुटती अन आमचंच बारं चढाचं पानी काय भेटेना दादा , येतुस कारं गावाकडं ? अरे , घे की बदली करुन सायेब खुष आहे सद्या तुझ्यावर आपल्या धरणावर लै गोंधळ हाय बाबा जराशीक लावून दे की शिस्त लोकं लै नाव घेतील तुझं म्हातारी थकलीया , बापुसबी होईना पहिल्यासारखं पन तुला कुठलं जमायला म्हना वैनी मोडता घालणार पोरांनाबी नाय करमणार गावाकडं त्यातून इथल्या शाळा सगळ्या मराठी ...
घोडा लंबे रेसका है! अश्वमेधाच्या घोडयाला तो अडवणार आहे !! बोले सो निहाल , सत श्री अकाल , माझ्या भावांनो वाहे गुरू , माझ्या बहिणींनो सलाम , शेतक-यांनो . सलाम , तमाम भूमिहिनांनो राम राम , ऊस तोडणी कामगारांनो शेतीतून बाहेर पडणा-या तरूणांनो , शेतीत राबराबूनही मान-सन्मानाचे पिक हाती न येणा-या मैत्रिणींनो , स्वत:च्या देशातच निर्वासित झालेल्या टाळेबंद नागरिकांनो शहरात मोलमजूरी करणा-या कोरडवाहूंनो , ज्ञानबा-तुकाराम . पुंडलिक वरदा हारी विठठल कौतुक माऊली , हमी भावाच्या पांडुरंगाची ओढ लागलेल्या तुम्हा वारक-यांचं कौतुक , तुमच्या सहनशक्त्तीचं थंडीवा-यात , उन-पावसात , हाल अपेष्टांकडे दुर्लक्ष करत एका असमान लढयात उतरलेल्या वेडयापिरांचं अखंड भारताच्या उन्मादी जयजयकारात खंदक खोदुन अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून पाणी-तोफा डागून तुमचं स्वागत झालं पण तुम्ही शांत राहिलात कारण या देशाच्या सातबा-यावर मूळ नोंद तुमची आहे दिल्लीच्या वेशीवर आज इतिहास कुस बदलतो आहे कारण धर्म , जात , प्रांत ...
पाणी मागतात ... च्यायला लोकं उद्धट व्हायला लागली आहेत पाणी मागतात - पिण्याकरता , शेतीकरता ठोकून काढलं पायजे साल्यांना साहेबांनी म्हटलं - अहो , जलनीती घ्या कायदे करू , नियम करु येगळं प्राधिकरनच देतो की पन ह्यांचं आपलं येकच पाणी मागतात ... च्यायला सायबांनी असंबी म्हटलं नदीजोड व्हायला पायजेल आहे कोर्टाचा आदेशच आहे तसा पश्चिमेच्या नद्या फिरवू की पुर्वेला ह्ये अशी वळवायची नदी अन ह्यो उचलायची पन ह्यांचं आपलं येकच पाणी मागतात ... च्यायला कान इकडं करा तुमाला म्हणून सांगतो साहेब म्हनाले - इनटरनल शिक्युरिटिला लै धोका आहे आता टॅंकरवर काम भागणार नाही , राजेहो साहेब तर म्हनतात - आता टॅंकच बोलवा टॅंक . टॅक . रणगाडा ! धडाधडा .... पाणी मागतात ... च्यायला साहेब जाऊन आले परवा चायनाला केवढी प्रगती केली राव त्यांनी - थ्री गारजेस सायबाला विचारलं एवढं सगळं जमवलं कसं त्यांनी ? साहेब म्हनले - पयले तियानमेन केलं . तियानमेन ! ते मेन !! आपण काहीच करत नाही . कशी होणार प्रगती ? पाणी मागतात ... च्यायला
Comments
Post a Comment