घोडा लंबे रेसका है! अश्वमेधाच्या घोडयाला तो अडवणार आहे !! बोले सो निहाल , सत श्री अकाल , माझ्या भावांनो वाहे गुरू , माझ्या बहिणींनो सलाम , शेतक-यांनो . सलाम , तमाम भूमिहिनांनो राम राम , ऊस तोडणी कामगारांनो शेतीतून बाहेर पडणा-या तरूणांनो , शेतीत राबराबूनही मान-सन्मानाचे पिक हाती न येणा-या मैत्रिणींनो , स्वत:च्या देशातच निर्वासित झालेल्या टाळेबंद नागरिकांनो शहरात मोलमजूरी करणा-या कोरडवाहूंनो , ज्ञानबा-तुकाराम . पुंडलिक वरदा हारी विठठल कौतुक माऊली , हमी भावाच्या पांडुरंगाची ओढ लागलेल्या तुम्हा वारक-यांचं कौतुक , तुमच्या सहनशक्त्तीचं थंडीवा-यात , उन-पावसात , हाल अपेष्टांकडे दुर्लक्ष करत एका असमान लढयात उतरलेल्या वेडयापिरांचं अखंड भारताच्या उन्मादी जयजयकारात खंदक खोदुन अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून पाणी-तोफा डागून तुमचं स्वागत झालं पण तुम्ही शांत राहिलात कारण या देशाच्या सातबा-यावर मूळ नोंद तुमची आहे दिल्लीच्या वेशीवर आज इतिहास कुस बदलतो आहे कारण धर्म , जात , प्रांत ...
करोना - स्वगते सोशल डिस्टनसिंग - सामाजिक अंतर राखणे हे तसे आपल्याला काही नवीन नाही वसुधैव कुटुंबकम आणि हे विश्वची माझे घर म्हणण्याची काळजी घेत पूर्वापार , सर्वदूर , सर्वत्र आपण अंतर राखुनच आहोत धर्माचा मास्क लावत जातीचा सॅनिटायझर वापरत कधी लिंगभेद तर कधी आर्थिक पायरीचं सोवळं सांभाळत लॉकडाऊन मुळे आता सगळं कसं ऑफिशीयल झालं नाऊ नो मोअर पर्सनल गिल्ट! वैयक्तिक अपराध-भावनेतून सुटका झाली. थ्यॅंक्यु सो मच , करोना!! *** फार वर्षांपासून अपूर्ण राहिलेली माझी एक कविता पहिल्या काही ओळीतच अडकलेली "जग मित्रा असंच असतं कधी आपलं कोणीच नसतं गर्दीत राहून हरवलं जाणं रोज आपल्या नशीबी असतं" *** आता करोनाने गर्दी संपवली कोशात राहणा-या माझ्यासारख्यांसाठी सोसायटीच्या दारावर २४ बाय ७ सिक्युरिटी गार्ड ठेऊन टिश्यु पेपरने दाराचे हॅंडल बंद करून कंफर्ट झॊन मध्ये आम्ही सेफ वारंवार सॅनिटायझर वापरत , मास्क लावून , गरम पाणी पित , वीस नव्हे चाळीस सेकंद गरम पाण्याने हात धूत स्वागत करतो आहोत कठोर निर्णयांचं थाळ्या वाजवत , शंखध्...
हत्या नव्हे पुन्हा एकदा "वध" झाला हा नथुरामचा वारसा हे राज्य माफियांचे दाभोळकर सिर्फ झांकी है फुले, शाहू,आंबेडकर बाकी है हा तालेबानी वारसा हे राज्य माफियांचे वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकबुद्धी... काय साली बकवास आहे पहा पुरोगामित्वाचा आरसा हे राज्य माफियांचे -प्रदीप पुरंदरे, औरंगाबाद (२०.८.२०१३)
Comments
Post a Comment