मद्रास कॅफे - २५.८.२०१३
काळ्या बुधवारच्या कविता-१९८४,१९९१,२०१३...... आज "मद्रास कॅफे" बघितला. आवडला. जुन्या जखमांवरची खपली निघाली - पुन्हा एकदा. १९८४ साली इंदिरा गांधींची हत्या झाली. मी "काळ्या बुधवारच्या कविता" लिहिल्या. औरंगाबादच्या दै. मराठवाड्याने त्या छापल्या. १९९१साली राजीव गांधींची हत्या झाली. मी त्याच कविता परत दै.मराठवाड्याकडे पाठवल्या-खालील टिपणीसह. "सद्यस्थिती वर्णन करताना आज माझ्या जुन्याच कविता उपयोगी पडाव्यात हा माझा व माझ्या पिढीचा पराभव आहे. आमच्या षंढत्वाचाच तो पुरावा!" दै. मराठवाड्याने त्या परत छापल्या. सन २०१३. दहशतवाद जोरात आहे. देशात परत एकदा उन्मादी वातावरण निर्माण केले जात आहे. दाभोळकरांची हत्या झाली आहे. बलात्कार होता आहेत आया बहिणींवर, विचारांवर..... विषमता व वैर कमी व्हावे सज्जनशक्ती वाढावी विवेकबुद्धी व वैज्ञानिक दृष्टीकोन असावा असा आग्रह धरणारे आज जात्यात भरडले जात आहेत आणि सुपातही नसलेला मी फक्त त्याच जुन्या कविता post करतो आहे-परत एकदा माध्यम आधुनिक झाले एवढेच बाकी काहीच बदलले नाह...