रांजण काही भरत नाही
मराठवाड्याच्या पाणी प्रश्ना संबंधी द. १७ सप्टेंबर २०१३ रोजी औरंगाबाद येथे महामोर्चा निघणार आहे. त्या संदर्भात थोडे गद्य थोडे पद्य. आपण यांना पाहिलेत का? अनेक वर्षांपूर्वी हरवले आहेत - नदीखोरे अभिकरणे - राज्य जल मंडळ - राज्य जल परिषद - एकात्मिक राज्य जल आराखडा - महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण - जलनीती.....जलकायदे ****** कालवा आहे तर धरण नाही धरण आहे तर कालवा नाही दोन्ही असेल तर पाणी नाही पाणी असेल तर टेलपर्यंत पोहोचत नाही कायदा आहे तर नियम नाही नियम आहे तर करार नाही करार आहे तर जी. आर. नाही जी.आर. आहे तर परिपत्रक नाही समिती आहे तर अहवाल नाही अहवाल आहे तर शिफारस नाही शिफारस आहे तर स्वीकार नाही स्वीकार आहे तर अंमल नाही नाथा घरची उलटी खूण पाणी आहे......इच्छा नाही रांजण काही भरत नाही *****