Posts

चार कविता - भारत बंदच्या निमित्ताने

  घोडा लंबे रेसका है! अश्वमेधाच्या घोडयाला तो अडवणार आहे !!   बोले सो निहाल , सत श्री अकाल , माझ्या भावांनो वाहे गुरू , माझ्या बहिणींनो सलाम , शेतक-यांनो . सलाम , तमाम भूमिहिनांनो राम राम , ऊस तोडणी कामगारांनो   शेतीतून बाहेर पडणा-या तरूणांनो , शेतीत राबराबूनही मान-सन्मानाचे पिक हाती न येणा-या मैत्रिणींनो , स्वत:च्या देशातच निर्वासित झालेल्या टाळेबंद नागरिकांनो शहरात मोलमजूरी करणा-या कोरडवाहूंनो , ज्ञानबा-तुकाराम . पुंडलिक वरदा हारी विठठल   कौतुक   माऊली , हमी भावाच्या   पांडुरंगाची ओढ लागलेल्या तुम्हा वारक-यांचं कौतुक , तुमच्या सहनशक्त्तीचं थंडीवा-यात , उन-पावसात , हाल अपेष्टांकडे दुर्लक्ष करत एका असमान लढयात उतरलेल्या वेडयापिरांचं   अखंड भारताच्या उन्मादी जयजयकारात खंदक खोदुन   अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून पाणी-तोफा डागून तुमचं स्वागत झालं पण तुम्ही शांत राहिलात कारण या देशाच्या सातबा-यावर मूळ नोंद तुमची आहे   दिल्लीच्या वेशीवर आज इतिहास कुस बदलतो आहे कारण धर्म , जात , प्रांत , लिंग .... कोणत्याच ध्रुवीकरणाला तुम्ही ब

करोना - स्वगते

करोना - स्वगते सोशल डिस्टनसिंग - सामाजिक अंतर राखणे हे तसे आपल्याला काही नवीन नाही वसुधैव कुटुंबकम आणि हे विश्वची माझे घर म्हणण्याची काळजी घेत पूर्वापार , सर्वदूर , सर्वत्र आपण अंतर राखुनच आहोत धर्माचा मास्क लावत जातीचा सॅनिटायझर वापरत कधी लिंगभेद   तर कधी आर्थिक पायरीचं सोवळं सांभाळत लॉकडाऊन मुळे आता सगळं   कसं ऑफिशीयल झालं नाऊ नो मोअर पर्सनल गिल्ट! वैयक्तिक अपराध-भावनेतून सुटका झाली. थ्यॅंक्यु सो मच , करोना!! *** फार वर्षांपासून अपूर्ण राहिलेली माझी एक कविता   पहिल्या काही ओळीतच अडकलेली "जग मित्रा असंच असतं कधी आपलं कोणीच नसतं गर्दीत राहून हरवलं जाणं रोज आपल्या नशीबी असतं" *** आता करोनाने गर्दी संपवली कोशात राहणा-या माझ्यासारख्यांसाठी सोसायटीच्या दारावर २४ बाय ७ सिक्युरिटी गार्ड ठेऊन टिश्यु पेपरने दाराचे हॅंडल बंद करून कंफर्ट झॊन मध्ये आम्ही सेफ वारंवार सॅनिटायझर वापरत , मास्क लावून , गरम पाणी पित , वीस नव्हे चाळीस सेकंद गरम पाण्याने हात धूत स्वागत करतो आहोत कठोर निर्णयांचं थाळ्या वाजवत , शंखध्वनी

सहा थेंब - दुष्काळाच्या निमित्ताने

शासन इतकी वर्षे टॅंकरवर होते जमाना बदलला आता अच्छे दिन आ गये जेसीबी पोकलेनचे पाणी न्यायालयाची पायरी चढले जलहित याचिकांचा महापूर आला आम्ही सांगतच होतो मूळ दुखणे कॉलेजियम मध्ये आहे कमिटया स्थापन होता आहेत तसे आम्ही "कमिटेड" आहोत दुष्काळ काय येतच असतात शेवटी निसर्गापुढे कोणाचे काय चालणार ? ठिबक येणार बघा , बघा , पाईपलाईन्सदेखील आल्या नदीजोड होणार अगदी आसेतू हिमाचल! आणि जलयुक्त शिवार तर कवाच झालं की राव एक पाऊस झाला की बस... रिमझेम के तराने लेके आयी बरसात!! वाफाळलेला चहा प्या गरमा गरम कांद्याची भजी खा (कांदा जीवनावश्यक आहे) आणि काय हा अरसिकपणा ? दुष्काळावर कसल्या चर्चा करता ? मेघदूत वाचा , मेघदूत!!! -प्रदीप पुरंदरे ५जुलै २०१६

आम्ही "त्यांच्या" बरोबर आहोत! तुम्ही?

जातजमात वाद व धार्मिक उन्माद, बलात्कार व भ्रष्टाचार, राजकीय टगेगिरी व चेल्याचपाट्यांची भांडवलशाही, दुष्काळ, गारपिट आणि शेतक-यांच्या आत्महत्या, रोजगार हमीतील चो-यामा-या  आणि भृणहत्या, टॅंकरमागे धावणा-या बायाबापड्या आणि ऊसबाधा झालेले मग्रुर पुढारी आसारामी अध्यात्म आणि सुदर्शन बाजार असा विविधतेने नटलेला भारत देश..मेरा प्यारा हिंदोस्ता! जिन्हे नाझ है हिंदपर वो कहां है ? असा ‘प्यासा’ प्रश्न पुन्हा एकदा आसमंतात आहे. तो विचारण्याचे धाडस दाखवणा-यांबरोबर आम्ही आहोत. तुम्ही? मोलकरणी, हमाल – माथाडी, कामगार, अंगणवाडी सेविका,  शेतकरी, शेतमजुर, दलित, आदिवासी, शुद्रातिशुद्र आणि असहाय्य महिला अशा असंघटितांच्या बाजूने आयुष्यभर लढणा-या ‘माणसां’ बरोबर आम्ही आहोत. तुम्ही? रेशन कार्ड, रोजगार, पेन्शन, सर्वांना शिक्षण, साक्षरता, प्यायला पाणी, दुपारला भाकरी, रातच्याला वाईच अंथरूण पांघरूण..... ........... मागणं लै नाही बाप्पा मूलभूत मागण्यांसाठी सतत आंदोलन करणा-या ‘साथी व कॉम्रेड’ बरोबर आम्ही आहोत. तुम्ही? पर्यावरणस्नेही विकास समन्यायी पाणीवाटप, जलवंचितांच्या

रांजण काही भरत नाही

मराठवाड्याच्या पाणी प्रश्ना संबंधी द. १७ सप्टेंबर २०१३ रोजी औरंगाबाद येथे महामोर्चा निघणार आहे. त्या संदर्भात थोडे गद्य थोडे पद्य. आपण यांना पाहिलेत का? अनेक वर्षांपूर्वी हरवले आहेत - नदीखोरे अभिकरणे - राज्य जल मंडळ - राज्य जल परिषद - एकात्मिक राज्य जल आराखडा - महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण - जलनीती.....जलकायदे ****** कालवा आहे तर धरण नाही धरण आहे तर कालवा नाही दोन्ही असेल तर पाणी नाही पाणी असेल तर टेलपर्यंत पोहोचत नाही कायदा आहे तर नियम नाही नियम आहे तर करार नाही करार आहे तर जी. आर. नाही जी.आर. आहे तर परिपत्रक नाही समिती आहे तर अहवाल नाही अहवाल आहे तर शिफारस नाही शिफारस आहे तर स्वीकार नाही स्वीकार आहे तर अंमल नाही नाथा घरची उलटी खूण पाणी आहे......इच्छा नाही रांजण काही भरत नाही *****

मद्रास कॅफे - २५.८.२०१३

काळ्या बुधवारच्या कविता-१९८४,१९९१,२०१३...... आज "मद्रास कॅफे" बघितला. आवडला. जुन्या जखमांवरची खपली निघाली - पुन्हा एकदा. १९८४ साली इंदिरा गांधींची हत्या झाली. मी "काळ्या बुधवारच्या कविता" लिहिल्या. औरंगाबादच्या दै. मराठवाड्याने त्या छापल्या. १९९१साली राजीव गांधींची हत्या झाली. मी त्याच कविता परत दै.मराठवाड्याकडे पाठवल्या-खालील टिपणीसह. "सद्यस्थिती वर्णन करताना आज माझ्या जुन्याच कविता उपयोगी पडाव्यात हा माझा व माझ्या पिढीचा पराभव आहे. आमच्या षंढत्वाचाच तो पुरावा!" दै. मराठवाड्याने त्या परत छापल्या. सन २०१३. दहशतवाद जोरात आहे. देशात परत एकदा उन्मादी वातावरण निर्माण केले जात आहे. दाभोळकरांची हत्या झाली आहे. बलात्कार होता आहेत आया बहिणींवर, विचारांवर..... विषमता व वैर कमी व्हावे सज्जनशक्ती वाढावी विवेकबुद्धी व वैज्ञानिक दृष्टीकोन असावा असा आग्रह धरणारे आज जात्यात भरडले जात आहेत आणि सुपातही नसलेला मी  फक्त त्याच जुन्या कविता post करतो आहे-परत एकदा माध्यम आधुनिक झाले एवढेच बाकी काहीच बदलले नाह

नरेंद्र दाभोलकर अमर रहे

हत्या नव्हे पुन्हा एकदा "वध" झाला हा नथुरामचा वारसा हे राज्य माफियांचे दाभोळकर सिर्फ झांकी है फुले, शाहू,आंबेडकर बाकी है हा तालेबानी वारसा हे राज्य माफियांचे वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकबुद्धी... काय साली बकवास  आहे पहा पुरोगामित्वाचा आरसा हे राज्य माफियांचे -प्रदीप पुरंदरे, औरंगाबाद (२०.८.२०१३)