Posts

Showing posts from August, 2013

मद्रास कॅफे - २५.८.२०१३

काळ्या बुधवारच्या कविता-१९८४,१९९१,२०१३...... आज "मद्रास कॅफे" बघितला. आवडला. जुन्या जखमांवरची खपली निघाली - पुन्हा एकदा. १९८४ साली इंदिरा गांधींची हत्या झाली. मी "काळ्या बुधवारच्या कविता" लिहिल्या. औरंगाबादच्या दै. मराठवाड्याने त्या छापल्या. १९९१साली राजीव गांधींची हत्या झाली. मी त्याच कविता परत दै.मराठवाड्याकडे पाठवल्या-खालील टिपणीसह. "सद्यस्थिती वर्णन करताना आज माझ्या जुन्याच कविता उपयोगी पडाव्यात हा माझा व माझ्या पिढीचा पराभव आहे. आमच्या षंढत्वाचाच तो पुरावा!" दै. मराठवाड्याने त्या परत छापल्या. सन २०१३. दहशतवाद जोरात आहे. देशात परत एकदा उन्मादी वातावरण निर्माण केले जात आहे. दाभोळकरांची हत्या झाली आहे. बलात्कार होता आहेत आया बहिणींवर, विचारांवर..... विषमता व वैर कमी व्हावे सज्जनशक्ती वाढावी विवेकबुद्धी व वैज्ञानिक दृष्टीकोन असावा असा आग्रह धरणारे आज जात्यात भरडले जात आहेत आणि सुपातही नसलेला मी  फक्त त्याच जुन्या कविता post करतो आहे-परत एकदा माध्यम आधुनिक झाले एवढेच बाकी काहीच बदलले नाह

नरेंद्र दाभोलकर अमर रहे

हत्या नव्हे पुन्हा एकदा "वध" झाला हा नथुरामचा वारसा हे राज्य माफियांचे दाभोळकर सिर्फ झांकी है फुले, शाहू,आंबेडकर बाकी है हा तालेबानी वारसा हे राज्य माफियांचे वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकबुद्धी... काय साली बकवास  आहे पहा पुरोगामित्वाचा आरसा हे राज्य माफियांचे -प्रदीप पुरंदरे, औरंगाबाद (२०.८.२०१३)

असंच असतं

जग मित्रा असंच असतं कधी आपलं कोणीच नसतं गर्दीत राहून हरवलं जाणं रोज आपल्या नशीबी असतं

आधार कार्ड

आधार देण्याची क्षमता नाही आधार घेण्यास पात्र नाही इतके आपण आधारहीन अन आधार कार्डही आलेलं नाही

आपण ह्यांना पाहिलत का?

जग बदलायला निघालेलो आपण किती बदललो? कोणीच आपल्याला ओळखत नाही! आणि आरशात पाहिले तर प्रश्न पडला आपण ह्यांना पाहिलत का?

जागल्याचे गीत

शब्द होतील फौजी माझे ओळ न ऒळ हल्ला बोलेल कविताच असेल मोर्चा माझी पहिली लाठी कवी झेलेल

अपराधी

बैस जरा निवांत किती दमली आहेस! पाणी घे पंखा लावतो स्वत:साठी वेळ काढ जरा ..... काय म्हणतेस - अपराधी वाटतं? घरासाठी वेळ देणं जमत नाही?? व्यवस्था अगं अशीच असते शोषित स्वत:लाच दोष देतो बळीच स्वीकारतो आळीमिळी गुपचिळी

पुन्हा एकदा रात्र

पुन्हा एकदा रात्र फक्त दीड वाजतोय वाचायचा कंटाळा आलाय अर्थहीन शब्द वाक्ये बेजान तरीही पानोपान व्यवस्थित एकाखाली एक पडलेली पूर्णविरामांशी अपरिहार्य टकरा देत तेच विचार तेच प्रश्न काही वास्तव काही खाजवून काढलेले तीच उत्तरे - काही प्रामाणिक, काही पळपुटी बहुतेक सगळीच अर्धवट सगळं जणू गोठावलं गेलंय डोक्यात विचार जेव्हा घेराओ घालतात थकलेल्या मेंदूला तेव्हा आम्हीसुद्धा सपशेल कबूल करतो ‘घेराओ हिंसक असतात’ असले काही तरी विचार एकसारखे अन झोपेनं अलिकडे असहकार पुकारलेला...

प्रिये बाहुली

भरल्या संसाराची पूर्णच स्वप्ने! तरीही म्हणतेस जाणवते पोकळी ऎकू येतात माझी गाणी अंधारून येतं एकलेपण वारंवार संध्याकाळी सुरक्षितता महाग पडली भातुकलीचा कंटाळा आला बंडाचीही तयारी नाही प्रिये बाहूली, गेला क्षण येणार नाही

मानुषी

तू म्हणजे अनाकलनीय कोडं कधी गंभीर तू , उदास अबोल तू कधी खट्याळ तू , अल्लड मधुबाला तू मोहमयी उन्मादक तू , गरम नरम आमंत्रण तू कधी राग राग तू , कधी वात्सल्याचा महापूर तू हळवी रडवी व्याकूळ कधी तू लबाड फसवी धूर्त कधी तू कधी चेतवणारी शामा चंचल भल्या पहाटे शांत निग्रही विरागिनीही ध्यानस्थ कधी तू आधार शोधताना दिशाहीन कधी तू अबोल विरहिणी शापित यक्षिणी कधी तू आश्वासित, घनगंभीर, स्वतंत्र, निर्भय आकाश पेलताना तेजस्विनीही आधार कधी तू

बुद्धा

गंमत अशी आहे बुद्धा, माणूस जेव्हा राजवाड्यातून बाहेर पडतो दु:खाच्या शोधात तेव्हा तो होतो बुद्ध. भगवान बुद्ध. आणि एखाद्या खोपटात पैदा होणारा जेव्हा झगडतो दु:खाशी वेशीबाहेर टांगून घेऊन किंवा पाईपात मोर्चे बांधून तेव्हा मात्र तो होतो ‘महारडा’ - नवबौद्ध! (दै. श्रमिक विचार, १ नोव्हें. १९८३)

पैसा

पालवी फुटण्याच्या मोसमातच माथ्यावरच्या लाचखाऊ ढगानं बिनधास्त नकार दिला माझ्या अंगणात बरसायला कारण मी कधीच म्हणालो नाही ये रे ये रे पावसा तुला देईन पैसा पैसा पैसा

भगीरथा

स्वर्गातून गंगा आणणा-या भगीरथा तुझे कोरडवाहू वंशज आम्ही गंगेतून वीस शतकांचे पाणी वाहून गेल्यावर आजही असहाय्य झगडतो आहोत सनातन दुष्काळाशी आमच्या हजारो गावांना जलसमाधी देऊन धरणं बांधली मंत्रालयातील वातानुकूलित योजनाकारांनी आणि आज आमच्या घामावर, रक्तावर पुकपुकतात बड्या बागाईतदारांच्या मोटार सायकली अडवल्या गेलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाने तरारली आहेत पिके विषमतेची वाया गेलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाने बेचिराख स्वप्ने तुझ्या कोरडवाहू वंशजाची दुष्काळी वा-यावर डोलणारे सत्तेचे हिरवे सागर बनवतात प्रत्येक कालव्याला एक दारिद्र्यरेषा आणि कोरडवाहू खेड्यांचे आम्ही पुरातन रहिवासी फिरतो पाण्याविना उध्वस्त दाहीदिशा सत्ता मुठीत ठेवणारे साखरेचे हात नासवतात आमची काळी आई अन पाटापाटावर करून पाण्याचा काळाबाजार कुंपणच येथे शेत खाई बस्स झालं भगीरथा आता तुझा कोरडवाहू वंशज सगळेच बांध फोडील (दै.मराठवाडा, २१ऑक्टोबर १९८४)

मंत्रालयाला आग लागली पळा पळा पळा

    (सहा कडवी: तीन अशी, तीन तशी)                                                                                                                                   मंत्रालयाला आग लागली पळा पळा पळा जळली तत्वे , खाक मूल्ये चवदार तळ्याचे पाणी आणा आणा आणा मंत्रालयाला आग लागली पळा पळा पळा मंत्रालयाला आग लागली पळा पळा पळा जळतो शेतक - याचा आसूड ज्योतिबाच्या हौदाचे पाणी आणा आणा आणा मंत्रालयाला आग लागली पळा पळा पळा मंत्रालयाला आग लागली पळा पळा पळा संतांच्या भूमित स्त्री - भ्रूण हत्येचा वणवा श्रीखंडयाची कावड रांजणाचे पाणी आणा आणा आणा मंत्रालयाला आग लागली पळा पळा पळा ? ?? ??? ???? मंत्रालयाला आग लागली पळा पळा पळा शासनाची धोरणे जणू झेंडूची फुले क - हेचे पाणी आणा आणा आणा मंत्रालयाला आग लागली पळा पळा पळा मंत्रालयाला आग लागली पळा पळा पळा चमकतो खंजीर आघाडीच्या धगीत प्रितीसंगमाचे पाणी आणा आणा आणा मंत्रालयाला आग लागली पळा पळा पळा मंत्रालयाला आग लागली पळा पळा पळा समित्यांच्या बाटल्या , आयोगांचे टॅंकर रखडलेल्या प्रकल्पांचे पाणी आणा आणा आ

ज्योतिबा फुल्यांच्या सिंचननोंदी: सन १८८३

     - प्रकरण क्र . ८ ( पृष्ठ क्र . ३६ ते ४१ ), " सिंचननोंदी ", लेखक - प्रदीप पुरंदरे , प्रस्तावना - अण्णासाहेब शिंदे , प्रकाशक - एस . एम . जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन , पुणे , जुलै १९९२ ( २७ ऑगस्ट १९८९ ते ४ मार्च १९९० या कालावधीत दै . मराठवाडयात लिहिलेल्या १२ लेखांचे संकलन ) प्रस्तुत गद्य - पद्य लेख दि . ३ डिसेंबर १९८९ रोजी दै . मराठवाडयात प्रसिद्ध झाला होता . अण्णासाहेब शिंदे यांनी या लेखाचा त्यांच्या प्रस्तावनेत विशेष उल्लेख केला आहे . महात्मा ज्योतिबा फुले , माफ करा ! पण तुम्ही खरंच होऊन गेलात का हो ? नाही म्हणजे काय आहे आम्ही काही तुम्हाला पाहिलं नाही वाचलं आहे थोडंफार ऎकलं सुद्धा बरंच आहे ऑफिसात फोटो आहे पण खरंच सांगतो खरं काहीच वाटत नाही     *** तुम्ही म्हणे १८८३ साली शेतक - यांचा आसूड फटकारला बळीराजाचं गा - हाण मांडलं आणि चक्क सिंचनाबद्दल सुद्धा लिहिलंत महात्मा ज्योतिबा फुले , काय हा उद्धटपणा ! अहो , सिंचनसंस्थानाबद्दल आळीमिळी गुपचिळी धोरण स्वीकारण्याची आजदेखील प्रथा असताना तुम्ही सपशेल १०६ वर्षांपूर्वी सिंचनाबद्दल